Ahmednagar Crime News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचे मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या कारणातून एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणांना बेदाम मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच तब्बल १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील उंबरे गावात गुरुवारी ही हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८१७ / २०२३ नुसार भा.दं.वि. कलम २९५, २९५ (अ), १४३, १४७, १४८, १४९, ४२७, क्रिमीनल लॉ. अमेंडमेंट २०१३च्या कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे सलिम वजिर पठाण (वय ४३, राहणार उंबरे, ता. राहुरी) यांनी तब्बल ५० जणांविरोधात फिर्याद दिली आहे.
तीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र रायभान मोहिते (वय २५, रा. गणेशवाडी, सोनई, ता. नेवासा), गणेश अशोक सोनवने (वय २१ वर्षे, रा. श्रीरामवाडी, सोनई, ता. नेवासा), शेखर बाळासाहेब दरंदले (वय ३०, सोनई), सचिन विजय बुऱ्हाडे (वय २५, रा. शिवाजी चौक, राहुरी), नवनाथ भागीनाथ दंडवते (वय ३६, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी), संदिप भाऊसाहेब लांडे (वय ३२, रा. लांडेवाडी, सोनई),
शुभम संजय देवरे (वय २५, रा. स्टेशन रोड, राहुरी, ता. राहुरी), सुनिल उत्तम दाभाडे (वय २६, रा. क्रांतीचौक, कातोरे गल्ली, राहुरी), मारुती बाळासाहेब पवार (वय २२, रा. निंभारी, ता. नेवासा) प्रतिक प्रकाश धनवटे (वय २९, रा. तनपुरे गल्ली, राहुरी), अभिषेक हुडे या ११ जणांना अटक केली आहे. तर ३५ ते ४० जण फरार असुन त्यांची धरपकड सुरू असल्याचे समजले. या आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेची माहिती काळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपाधीक्षक संदिप मिटके, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तब्बल १०० ते १५० पोलिस अधिकारी व कर्मचारी सध्या उंबरे गावात तळ ठोकून आहेत.
गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शांतता ठेवावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, गैरकृत्य करणाऱ्यावर पोलिस कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.