अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे Dy.s.p. संदीप मिटके यांनी चित्रपटातील प्रसंगलाही लाजवेल अशा घडलेल्या घटनेत स्वतच्या जीवाची पर्वा न करता ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची अतिशय प्रसंगावधान राखून सुटका केली या धाडसी कारवाईचे कौतुक आज रोजी नाशिक परिक्षेत्राचे IG श्री. B.G.शेखर यांनी केले.
काल दि.7/10/2021 रोजी सकाळी डीग्रस येथे पीडित महिला,त्यांचे पती मुलगा व मुलगी हे त्यांचे राहते घरी असताना त्यांचा मुलगा सकाळी कचरा टाकण्यासाठी मागील दरवाजाने बाहेर गेला असता तेथे दबा धरून बसलेल्या आरोपी नामे सुनील लोखंडे यांने मागील दरवाजाने घरात प्रवेश केला व पीडित महिला यांच्या मुलाच्या कमरेला बंदूक लावून मागोमाग घरात आला व त्याने आई कोठे आहे?
तिला बाहेर बोलाव असे म्हणून आरडाओरड करू लागला सदर ओरडण्याचा आवाज आल्याने पीडित महिला यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता आरोपी सुनील लोखंडे याने त्यांचे मुलास रिव्हॉल्वर लावून त्यास घरातील बेडरूमकडे घेऊन येत असताना दिसल्याने त्यांनी बेडरुमचा दरवाजा आतून लॉक केला
आरोपीने पीडित महिलेचे यांना बाहेर येण्यासाठी सांगून.त्यांच्या मुलीच्या दिशेने एक गोळी फायर केली सदर गोळी तिचा भाऊ याचे काना जवळून गेली गण मधून गोळी फायर झाल्यानंतरही पीडित महिला यांनी दरवाजा उघडला नाही हे बघून आरोपीने मी आता गॅस सिलेंडरच्या टाकीला गोळी मारून स्फोट घडवून आणतो,
तू बाहेर ये मी तुला गोळी घालतो तू जर बाहेर आली नाही तर मी तुझ्या मुलांना व पतीला गोळ्या घालीन असे आरोपी म्हणाला सदर वेळी पीडित महिला यांनी Dy.s.p. संदीप मिटके यांना सदर घटनेबाबत माहिती दिली
व तात्काळ पोलीस मदत मिळण्यासाठी विनंती केली. घटनास्थळावर तात्काळ पोहोचत Dy.s.p. संदीप मिटके साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदरची परिस्थिती अतिशय समयसूचकता दर्शवित अत्यंत कौशल्याने हाताळीत आरोपीला शरण येण्यासाठी सांगून आरोपीशी संयमाने चर्चा चालू ठेवली
परंतु आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदीप मिटके यांनी त्याला बोलण्यात गुंतवून त्याचे मतपरिवर्तन केले “ओलीस ठेवलेल्या मुलीस सोड वाटल्यास पिस्तुल माझे डोक्यावर ठेव”
असे सांगून मुलीची सुटका केली.मुलगी दाराजवळ जाताच आरोपीचे लक्ष विचलित केले व धाडसाने आरोपीच्या अंगावर झडप घेऊन पिस्तुलाचा बॅरल पकडला व आरोपीस खाली दाबले.
त्यावेळी आरोपीने एक गोळी फायर केली परंतु मिटके यांनी पिस्तुलाच्या बॅरल गच्च पकडून जमिनीचे दिशेने ठेवल्याने गोळी संदीप मिटके यांचे डाव्या पायाच्या पॅन्टला घासून गेली तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या पथकाने संदीप मिटके यांचे मदतीस येऊन आरोपी जेरबंद करून त्यास ताब्यात घेतले
सदरची कारवाई अतिशय संयमाने ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस खात्याची मान आदराने उंचावेल अशी कामगिरी केल्याने I.G.P. B.G.शेखर पाटील यांनी Dy.S.P.संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक केले.