Ahmednagar Crime : तरूणीच्या खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरुन नऊ जणांनी मिळुन गिता रमेश राठोड हिचा गळा आवळुन तिला लोखंडी राडने मारहाण करुन जिवे ठार मारले.

या प्रकरणातील पाच संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र धनदांड्यांचा आशिर्वाद असणाऱ्या आरोपींना पोलिस अटक करीत नाहीत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व एकजण साक्षीदार व पंचाना दमदाटी करीत असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेवुन उपोषण करण्याचा इशारा मयत गिता राठोडच्या आई-वडीलांनी दिला आहे. साकेगाव येथील गिता रमेश राठोड हीचा २९ मे २०२३ रोजी रात्री खुन करण्यात आला.

गिता एका मुलीला पळुन जाण्यासाठी मदत करीत असल्याचा तिच्या नातेवाईकांचा संशय होता. त्यावरुन तिला मारहाण करुन खुन करुन तिचे प्रेत विहीरीत टाकण्यात आले होते. नऊ आरोपींनी मिळुन हे कृत्य केले होते.

ज्याच्या वस्तीवर हा प्रकार झाला त्यांनाच अटक करण्यात पोलिस टाळाटाळ करीत आहेत. एक कर्मचारी या प्रकरणातील साक्षीदारावर दबाव आणतो, दमदाटी करतो आहे. त्याच्यावर कारवाई करावी. अशी मागणी मयत गिताच्या आईने सविता रमेश राठोड हीने केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटुन दि. १७ जुलै रोजी अहमदनगर येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे. गिता राठोड खुन प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे.

दोन महिला आरोपी व दोन पुरुष आरोपी अटक करणे बाकी आहे. आमची पथके आरोपीच्या शोधात आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. रामेश्वर कायंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पाथर्डी.