अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता.
विवाहानंतर काही महिन्यांनी रोहिणीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू केला. या छळाला कंटाळून रोहिणी हिने शुक्रवारी गुलमोहर रस्त्यावरील राहत्या घरात आत्महत्या केली.
रवींद्र डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रशांत (पती), संतोष (सासरा) आणि सुनिता (सासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.