अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्यालय सोडून विनापरवानगी रेड झोन पुण्यात प्रवेश केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी फिर्याद दिली.
लॉकडाऊनमध्ये अधिकाऱ्यांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन निरीक्षक आहुजा यांनी पूर्वपरवानगी न घेता ६ मे रोजी रेड झोन असलेल्या पुणे शहरात प्रवेश केला.
याप्रकरणी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आहुजा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पाटील यांनी अाहुजा यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com