अहमदनगर क्राईम

कोतवाली पोलिस ठाण्यात गाडे व कोतकर यांची परस्परविरोधी फिर्याद दाखल !

Published by
Ahmednagarlive24 Office

सक्कर चौकातील यश पॅलेस हॉटेलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करुन तू यश पॅलेस येथे काम करु नकोस, तू येथून कोठेही जा, अशी दमदाटी केल्याची व तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सचिन कोतकर यांच्यासह अकरा जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशकुमार रामनारायण सिंग (वय ४५ रा. नंदकिशोर रेसिडेन्सी, वडगाव गुप्ता रोड, नागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग हे २०२० पर्यंत उदयनराजे पॅलेस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत होते.

सन २०२१ मध्ये ते यश पॅलेस येथे नोकरीस लागले. तेव्हापासून उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन कोतकर हे त्यांना तू आमच्या समोर हॉटेल यश पॅलेस येथे काम करु नकोस, तू इतर कोठेही काम कर असे म्हणत दमदाटी करत होते.

त्या संदर्भात मला मारहाण पण झाली होती व त्याची पोलिसात तक्रार देखील केली होती. सोमवारी मध्यरात्री उदयनराजे पॅलेस येथील प्रिन्स याने फोन केला व शिवीगाळ केली.

त्यानंतर घरी जात असतांना सचिन कोतकर यांच्या सांगण्यावरून रोशनकुमार मिश्रा उर्फ राजन कुमार, प्रिन्स कुमार सिंग, निरज कुमार, अमन श्रीकांत सिंग, सुनिल कुमार सिंग, हनुमान रामदास झरेकर व ४-५ अनोळखी व्यक्तींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, यश पॅलेसची नोकरी सोडून उदयनराजे पॅलेसमध्ये नोकरी करत असल्याच्या कारणावरून व्यवस्थापक राकेशसिंग, शशिकांत गाडे, रमाकांत गाडे व युवराज गाडे यांनी नगर सोडून जाण्याची धमकी दिल्याची परस्पर विरोधी फिर्याद प्रिन्सकुमार हरिनारायण सिंग याने आज पोलिसात दाखल केली आहे.

Ahmednagarlive24 Office