अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव व सोनई परिसरात दरोडे टाकून लूटमार करणारी अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर पोलिसांना यश आले.
अटक केलेल्या या दरोडेखोरांच्या टोळीकडून २७ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अजय अशोक मांडवे (वय २२), प्रद्युम सुरेश भोसले (वय १९, दोघे रा. रा.सलाबतपूर, ता.नेवासा),
समीर उर्फ धिंग्या राजू सय्यद (वय २१, रा. मराठी शाळेजवळ, नेवासा फाटा), रामसिंग त्रिंबक भोसले (वय ३०, रा. सलाबतपूर, ता.नेवासा), बाळासाहेब उर्फ बयंग सुदमल काळे (वय ३४, रा. गेवराई, ता.नेवासा),
योगेश युवराज काळे (वय १९, रा. बिटकेवाडी, ता.कर्जत) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्याविरुद्ध श्रीरामपूर, शिर्डी, शेवगाव, नेवासा आदी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
२३ सप्टेंबर २०२१ रोजी बेलापूर येथील विलास उदय खंडागळे हे कुटूंबासमवेत त्यांच्या बंगल्यात झोपले असता त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला.
नंतर घरातील लहान मुलांना धारदार चाकूचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिनेव रोख रक्कम असा एकूण २ लाख ८२ हजाराचा ऐवज लुटला होता.
तसेच सोमनाथ भागिरथ चिंतामणी यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना धमकी देवून त्यांच्याकडील ३ लाख ७ हजाराचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.