खासगी बसची दुचाकीला धडक’ अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नीसह मुले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात अपघातांची महिला वाढली आहे. दरदिवशी होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागतो आहे.

यातच अशीच एक अपघाताची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकाजवळ हॉटेल नीलसमोर खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पतीचा मृत्यू झाला आहे.

तर या अपघातात पत्नी व दोन मुले जखमी झाले आहेत. अंबाराम नंदू डूडवा (वय 35 रा. बोल्हेगाव, अहमदनगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

त्याची पत्नी पप्पी अंबाराम डूडवा (वय 33) व त्यांची दोन मुले हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी जखमी पप्पी डूडवा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅव्हल्स चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अंबाराम हे त्यांच्या दुचाकीवर त्यांची पत्नी व दोन मुलांना घेऊन बोल्हेगाव येथून केडगाव बायपास रोडने वाळकी (ता. नगर) येथे जात होते.

नील हॉटेलसमोर पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाने अंबाराम यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या डूडवा पती-पत्नी व त्यांच्या दोन्ही मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे अंबाराम यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघात होताच बस चालक घटनास्थळावरून पसार झाला.