Ahmednagar Crime News : आठवड्यात लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या विरुद्ध एका महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली म्हणून तक्रारदार महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध आहेर यांनी लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलिसात गेल्या आठवड्यात एक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी आहेर यांनी लोणी पोलिसात आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून बदनामी केल्याबद्दल एक महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३ जुलै रोजी माझ्या मोबाईलवर एक व्हाट्सअप मेसेज आला. मी व्हिडीओ कॉल केला असता ती महिला असल्याने मी लगेच बंद केला. मात्र या महिलेने पुन्हा मेसेज पाठवून तो चुकून आल्याचे सांगताना माझे नाव व गाव विचारले. मी सुद्धा तिची माहिती विचारली. त्यानंतर आम्ही एकमेकांना व्हाट्सअप कॉल आणि मेसेज करू लागलो.
आमचे कॉल सुरू राहिल्याने आमची मैत्री झाली. २५ जुलै रोजी सायंकाळी सदर महिलेने मला कॉल आला व तिने लोणी खुर्द येथील पिंपरी निर्मळ रस्त्यावर मला येण्यास सांगितले. मी माझ्या एका मित्राला सोबत घेऊन तेथे गेलो.
माझ्याकडे तुझे कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअप चॅट, फोटो आहेत. मला १५ लाख रुपये दिले नाही तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीन म्हणून धमकी दिली. मी घाबरलो. जवळचे २५ हजार ५०० रुपये तिला दिले. ती आरडाओरड करू लागल्याने बँकेचा १५ लाख रक्कमेचा चेक सही करून दिला.
तसेच लोणी खुर्द येथील काही व्यक्तिविरुद्ध जमिनीच्या वादाची केलेली केस मागे घेण्यास सांग अन्यथा तुझ्याविरुद्ध तक्रार देईन अशी धमकी देत राहिली. मला मारहाण केली. तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने माझा मोबाईल फोडला.
आरडाओरड करून पोलिसांना बोलावले. मला शहर ठाण्यात नेऊन माझ्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. यावरुण महिला व तिच्या साथीदाराविरोधात लोणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.