अहमदनगर क्राईम

शिक्षक रस्ता चुकले मग पुढे काय झालं ते वाचा…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  नगर येथील शिक्षकाला राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ जवळ मारहाण करत मोटार सायकल व मोबाइल पळविल्याप्रकरणी अज्ञात रस्ता लूटारुंविरोधात बुधवार दि 19 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर येथील शिक्षक बजरंग तुकाराम बांदल (वय ४६ राहणार प्रेमदान हडको, सावेडी हे ) रात्री शिंगवे नाईक येथे हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतत असताना त्याची दिशाभूल होऊन ते चुकून राहुरीच्या दिशेने आले असता

त्यांना विद्यापीठ येथे आल्यानंतर रस्ता चुकल्याचे लक्षात आल्याने ते रस्त्याचे कडेला रात्री १०.३० वाजता थांबलेले असता दोन अज्ञात इसम त्यांचे काळ्या रंगाचे मोटारसायकलवर बजरंग बांदल

यांच्या जवळ येवून त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून बळजबरीने बांदल यांच्या खिशातील मोबाईल फोन व मोटारसायकल हिसकावुन घेत राहुरीच्या दिशेने निघुन गेले.

बजरंग तुकाराम बांदल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office