अहमदनगर क्राईम

तुमने किसी को ये बात बताई तो मै तुम्हे मार डालुंगा ! अहमदनगर शहरात 13 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य धक्कादायक म्हणजे…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात एका13 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक म्हणजे यातील आरोपीने आर्मीचा ड्रेस परिधान केला होता.दरम्यान याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार दि. 13 ऑक्टोबरला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सावेडी परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी सायकलवरून घरी जात असताना त्याला आरोपीने आवाज देऊन ‘तेरा नाम क्या है’ असे विचारले.

त्यावेळी फिर्यादीने नाव सांगितले असता आरोपीने ‘मै आर्मीवाला हू, हमारे गाडी का काम चल रहा है, मै इधर सु…. सु… कर सकता हु क्या’ असे विचारले असता फिर्यादीने त्याला होकार दिला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शेजारील काटवनात नेऊन अनैसर्गिक कृत्य केले.

तसेच ‘तुमने किसी को ये बात बताई तो मै तुम्हे मार डालुंगा’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office