अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : कोणाचा वाढदिवस आहे का ? अशी विचारणा करणाऱ्या तरूणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : जमा झालेली गर्दी पाहून कोणाचा वाढदिवस आहे का ? अशी विचारणा करणाऱ्या तरूणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दिनांक २९ जुलै २०२३ रोजी घडलीय. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा करण्यात आलाय.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रसाद शिवाजी जाधव (वय २९ वर्षे, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २९ जुलै २०२३ रोजी रात्री ९.३० वा. चे सुमारास प्रसाद जाधव व त्याचा मित्र सागर विजय सरोदे रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. हे राहुरी फॅक्टरी येथील चर्चचे समोरुन जात असताना चर्चच्या समोर दहा ते बारा लोकांचा घोळका दिसल्याने चर्चसमोर वाढदिवसासाठी गर्दी जमलेली असावी, असे वाटल्याने प्रसाद जाधव व सागर सरोदे तेथे थांबले.

आणि कोणाचा वाढदिवस आहे काय ? अशी विचारणा केली. तेव्हा आरोपी म्हणाले कि, कोणाचाही वाढदिवस नाही. आम्ही अविनाश सिताराम सरोदे याला मारण्यासाठी थांबलो आहे. असे म्हणाल्याने प्रसाद जाधव व सागर सरोदे दोघे फॅक्टरी येथील उपसरपंच चहाचे दुकानामध्ये चहा पिण्यासाठी गेले. तेथे आरोपी हे त्यांच्या पाठीमागे गेले.

आणि शिवीगाळ करण्यास सुरवात करुन तुझ्या बापाचा वाढदिवस होता काय. तु कशाला विचारणा केली. असे म्हणुन प्रसाद जाधव व सागर सरोदे या दोघांना लाथा बुक्क्याने व लाकडी काठीने मारहाण केली.

तसेच गाडीखाली घालुन मारुन टाकु, अशी धमकी दिली. यावेळी प्रसाद जाधव याच्या खिशातील तीन हजार सहाशे रुपये गहाळ झाले. घटनेनंतर प्रसाद शिवाजी जाधव याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब पडागळे, भावड्या वाघ, मयुर उर्फ टिंकू वाघमारे, अक्षय पवार (सर्व रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) या चार जणांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ahmednagarlive24 Office