Ahmednagar Crime : मयत व्यक्तीच्या जागी तोतया उभा करून, तसेच खोटे मुखत्यारपत्र तयार करून पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील २० गुंठे जमीन हडपल्याची तक्रार दाखल झाली आहे.
याप्रकरणी मारिया प्रभुणे (वय ५८, रा. आशिर्वादनगर, श्रीरामपूर) यांनी गुरूवारी कोतवाली ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे
दीपक सुभाष सुंबे (रा. आंधळे चौरे हौसिंग, भारत बेकरी समोर, बोल्हेगाव), संतोष वसंत जाधव (रा. कातोरे मळा, बोल्हेगाव), अतुल मनोहर भाकरे (रा. नागापूर, नगर),
मधुसन रमेश खंडेलवाल (रा. बालाजी कॉलनी, समतानगर, सावेडी), जितेंद्र राधामोहन खंडेलवाल व मिना जितेंद्र खंडेलवाल (दोघे रा. सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी मारीया प्रभुणे यांचे वडील वामन किसन प्रभुणे यांच्या नावावर पिंपळगाव माळवी येथे २० गुंठे शेत जमीन आहे. फिर्यादीच्या वडीलांना फिर्यादीसह आठ अपत्ये आहेत.
दरम्यान, दीपक सुंबे याने ही शेत जमीन हडपण्यासाठी मयत प्रभुणे यांच्या ऐवजी तोतया व्यक्ती उभा करून तो व्यक्ती वामन प्रभुणे आहे, असे दाखवून जमिनीचे खोटे मुखत्यार पत्र तयार केले. आहे. दरम्यान, फिर्यादी पिंपळगाव माळवी येथील तलाठी कार्यालयात गेल्यावर हा प्रकार उघड झाला.