अहमदनगर क्राईम

बनावट मृत्यूपत्र तयार करून जमीन हडपली : जाब विचारला असता दिली जीवे मारण्याची धमकी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर : एका मयत झालेल्या इसमाच्या नावाने बनावट मृत्यूपत्र तयार करत, त्या खोट्या मृत्यूपत्राच्या आधारे सातबारा व फेरफार नोंदीत बदल करून फसवणूक करत जमीन हडप केल्याप्रकरणी सहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप बाजीराव उदार, तुकाराम वामन ढगे, महेश जनार्दन ढगे , गोरख पोपट भवाळ , संपत जगताप, राजू तुकाराम जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अगस्ती पुंडलिक बोराडे

यांचा भाऊ विजय बोराडे हा मयत झाल्यानंतर फिर्यादीच्या भावाचा अंत्यविधी पोस्टमार्टम करून न देता अंत्यविधी करण्यास सांगत फिर्यादीच्या भावाचे नावावरील जमिनीचे बनावट मृत्युपत्र तयार केले. त्या मृत्युपत्रावर आरोपींनी फिर्यादीच्या मृत भावाची बोगस सही करत संगणमताने फिर्यादीच्या भावाची जमीन लाटली.

खोट्या मृत्युपत्राच्या आधारे सातबारा व फेरफार याच्यावर नोंदी करून जमिनीची नोंद गोरख पोपट भवाळ याच्या नावे करत. फिर्यादीची फसवणूक केली. तसेच प्रदीप उदार याने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत गावात राहण्यास मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office