अहमदनगर क्राईम

शेतकर्‍यांच्या कापूस खरेदी मध्ये दलालाकडून होतेय लूटमार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील अवैध खाजगी कापूस खरेदीदारांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात विलास फाटके यांचे उपोषण सुरु आहे.

दरम्यान फाटके यांनी अहमदनगर जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे खाजगी दलालाकडून कापूस खरेदी केला जातो.

या दलालांकडे कापूस खरेदीचा कुठल्याही प्रकारचा परवाना नाही. या व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाबाबत बाजार समिती कुठलीही हमी घेत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक व लुटमार होत आहे. या दलालांकडे घेतलेल्या कापसांच्या वजनातं मोठी तफावत आढळून येत आहे.

यांचे वजन काटे कधीही कोणीही तपासणी करत नाही. शेतकर्‍यांकडून उधार कापूस घेतला जातो. नंतर शेतकर्‍यांना पैसे दिले जात नाही. याबाबत बाजार समिती व सहायक निबंधक सहकार संस्था कार्यालय शेवगाव यांच्याकडे तक्रारी करूनही कारवाही केली जात नाही.

यामुळे शेतकर्‍यांची होणारी लुट थांबवावी. आपण जर शेतकर्‍यांना न्याय मिळून दिला नाही तर, लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणे भाग पडेल.असे निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24