अहमदनगर क्राईम

शिक्षणाचा मांडला बाजार…विद्यार्थ्याकडून लाच घेणाऱ्या लिपिकास अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोरोनामुळे आधीच शिक्षणाची दयनीय अवस्था झाली आहे. यातच अनेक कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच नगर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याकडून शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची लाच घेताना येथील एकता कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समधील लिपिकाला रंगेहाथ पकडले.

असद युसुफ खान पठाण (वय 42 रा. मुकुंदनगर) असे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार विद्यार्थी एकता कॉलेज येथे सायन्स द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते.

त्यांना तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाकरिता प्रवेश घेण्यासाठी लिपिक पठाण याने प्रवेश शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी बाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली.

त्यावरून एकता कॉलेज येथे पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. पठाण याने पंचासमक्ष तक्रारदाराकडे पाच हजार रूपयांची मागणी केली. तपोवन रोडवरील एका हॉटेल समोर लाचलुचपतच्या नगर पथकाने कारवाई करत असद युसुफ खान पठाण याला पकडले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office