अहमदनगर क्राईम

विवाहितेची आत्महत्या; ‘त्या’ युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसले (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Ahmednagar Suicide News) 

त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे माहेरी आलेल्या शितल चव्हाण या विवाहितेला अभिमन्यू भोसले त्रास देत होता.

त्याच्या त्रासाला कंटाळून शितलने पेटवून घेतले होते. तिला उपचारासाठी पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे तिने नगर तालुका पोलिसांना जबाब दिला होता.

यावरून भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारादरम्यान शितलचा मृत्यू झाला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी अभिमन्यू पसार झाला होता.

त्याचा शोध घेवुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कदम, दहिफळे, खिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office