मार्केट यार्डच्या व्यावसायिकास खंडणीची मागणी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published on -

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : उद्योजक तथा व्यापारी,व्यवसायिकास खंडणी मागण्याच्या घटना अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत. खंडणीखोराच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्यातील तसेच जिल्ह्यातील पोलिस दल सतर्क झाले असतानाही अहिल्यानगरच्या मार्केटयार्ड येथील एका व्यवसायिकास खंडणी मागण्याची घटना घडली.या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.दरम्यान या घटनेमुळे व्यवसायिक वर्गात एकच खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय झाला आहे.

याबाबतची पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पंकज कुमार मुरली प्रसाद वर्मा (वय २९, रा. लक्ष्मी मार्केट, कल्याण जि. कल्याण) हे फळ व्यावसायिक आहेत. ते अहिल्यानगरच्या फळमार्केट येथून फळ खरेदी करून कल्याण येथे फळविक्रीचा व्यवसाय करतात. ४ फेब्रुवारी रोजी वर्मा हे बागवान यांच्या फळाच्या गाळ्यामध्ये कामगारा समवेत बोलत होते.

या दरम्यान तेथे तीन अनोळखी इसम आले. त्यातील एक जण म्हणाला, मुझे अभी पता चला है, की तू यहाँ पर व्यापार करता है, तुझे यहाँ व्यापार करना है, तो मुझे पाच हजार रुपये महिना देना पडेगा, तुम मुझे जानता नही, मै इधर का डॉन सॅम ख्वाजा हु, असे म्हणून शिवीगाळ केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमानी वर्मा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

वर्मा यांनी ७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी सॅम ऊर्फ समीर शेख याच्यासह दोन अनोळखी इसमाविरुद्ध भा.न्या.सं. ३०८ (५) ११५ (२) ३५१ (२) ३५२, ३ (५) अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सेदवाड हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe