अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्या तीळ अकोला तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे कोंबड्याचोरी प्रकरणी तालुक्यात एकाचा खून झाला आहे.
सरपंचांकडे तक्रार केल्याचा राग धरून गर्दनी येथील दशरथ नारायण मडके यांचा खून झाला. कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून गर्दनीच्या दशरथ नारायण मडके याचा खून केल्याप्रकरणी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे.
गर्दणी येथे देवजी देवराम खोडके याने जुलै महिन्यात कोंबड्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला असता दशरथ मडके यांनी गर्दनी गावचे सरपंच यांना माहिती दिल्याचा राग मनात धरून आरोपी देवजी खोडके याने आरोपी कावजी मेंगाळ यास मदतीला घेऊन दशरथ मडके यांना बाजरीचे दाणे काढून झाल्यानंतर
सोबत घेऊन अकोले येथे दारू विकत घेऊन प्रवरा नदी पात्राच्या छोट्या पुलावर दारू पीत असताना आरोपी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांनी दशरथ मडके याला पाण्यात ढकलून देऊन जीवे ठार मारले आहे. याबाबत अनसूया मडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
की दशरथ नारायण मडके (रा. गर्दनी) यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय होता. देवजी खोडके याने या पोल्ट्रीतून कोंबड्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकराची मडके यांनी सरपंचांकडे तक्रार केली होती. त्याचा खोडके याला राग आला. दोन ऑक्टोबर रोजी मडके,
देवजी खोडके व कावजी मेंगाळ हे तिघे बाजरीचे दाणे काढण्याचे काम करून अकोल्यात आले. अकोले येथील छोट्या अगस्ती पुलावर दारू प्यायला बसले. मडके यांना दारूच्या नशेत अकोले येथील छोट्या पुलावरून वाहत्या पाण्यात ढकलले.
दशरथ मडके घरी आले नाही म्हणून त्यांच्या पत्नीने खोडकेकडे चौकशी केली. नंतर अनसूया मडके यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांत पती हरवल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मृत दशरथ पाण्यात पडून वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. नदीपात्रात शोध घेण्यात आला.
दशरथ यांचा मृतदेह शेकईवाडी प्रवरा नदीपात्रात आढळून आला. पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक हांडोरे तपास करीत आहेत.