Ahmednagar Crime : शेतातील कांदा गोणीमध्ये भरण्यास नकार दिल्याने निलेश दरेकर याने आई व पत्नीला खलबत्याचा लोखंडी तूंब्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात दि. १६ ऑगस्ट रोजी घडली.
सुरेखा निलेश दरेकर, वय ३० वर्षे, रा. मोरेवाडी, वांबोरी, ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरेखा दरेकर यांचे पती त्यांच्या आईला व पत्नीला म्हणाला की, तुम्ही दोघेजणी आज कांद्याच्या गोण्या भरा.
तेव्हा आई मुलगा निलेश याला म्हणाल्या की, तुझे वडील आत्ताच मयत झाले आहेत. त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण कांदे भरु, असे म्हणाले असता मुलगा निलेश याने घरातील खलबत्याचा लोखंडी तुंबा घेउन कांद्याची जाळी तोडु लागला.
तेव्हा आई त्याला म्हणाली की, तु जाळी तोडु नको व कांदे भरण्याची घाई करु नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने मुलगा निलेश याने आईला व पत्नीला लोखंडी तुंबा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर दरेकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती निलेश हौशीराम दरेकर रा. मोरेवाडी, वांबोरी ता. राहुरी याच्यावर भा.द.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.