अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील जवळे येथील दहावीच्या शाळकरी मुलीच्या संशयास्पद खुनाचे गुढ अद्याप उकलले नसून तिच्या डाव्या हातावर लिहीण्यात आलेला मोबाईल नंबर कोणाचा ?
याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, सकाळी मयत मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह जवळे येथे पोहचणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी जवळे ग्रामस्थांनी उस्फूर्त बंद पाळला.
मुलीचा तिच्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती. तिच्या हनुवटीवर तसेच डाव्या कानातून रक्त आलेले होते, त्यामळे तिचा घातपात झाल्याचाही संशय आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ती मृतावस्थेत आढळून आली, त्यावेळी ती विवश्र असल्याचीही माहीती पुढे आली आहे.
तिच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यासाठी चाकूचा धाक दाखवत तोंंडात कापडी बोळा कोंबण्यात आला असावा अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, तिच्या डाव्या हातावर एक मोबाईल नंबर लिहिलेला आढळून आला असून तो नेमका कोणाचा याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिस प्रशासनाकडे चौकशी केली असता तो मोबाईल नंबर तिच्या मैत्रीणीचा असल्याची माहीती समजली. मैत्रीणीशी तिचे दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी चर्चा झाली होती.
दोघींमध्ये शाळेतील अभ्यासावर चर्चा झाल्याचे मैत्रीणीने सांगितल्याचीही माहीती आहे.दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जवळे ग्रामस्थांनी उर्त्फुर्तपणे बंद पाळला. सकाळी निषेध सभा घेण्यात येऊन आरोपींचा शोध लागेपर्यंत अंत्यविधी न करण्यााची भुमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
मात्र पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी ग्रामस्थांशी संवाद साधीत आरोपींना जेरबंद करण्याची ग्वाही दिल्यानंतर अंत्यविधी करण्यास ग्रामस्थ राजी झाले.