अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे एका माणसाने पत्नीची हत्या करत स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. हा माणूस महिलेचा सातवा नवरा होता असे सांगितले जातेय.
लोकराम असं या आरोपीचं नाव आहे. दहा वर्षांपूर्वी लोकरामचं या महिलेशी लग्न झालं होतं. महिला त्याची दुसरी बायको होती आणि लोकराम तिचा सातवा नवरा होता.
बुधवारी रात्री लोकराम दारू पिऊन घरी आला. त्याचं त्याच्या बायकोशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात बायकोची हत्या केली.
आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. या दांपत्याचा मुलगा त्यांच्या घरी आला. त्याने दार वाजवूनही कुणीही दार उघडलं नाही,
म्हणून त्याने शेजाऱ्यांच्या मदतीन दरवाजा तोडला. तेव्हा त्याला त्याच्या आई वडिलांचे मृतदेह दिसले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com