अहमदनगर क्राईम

अरे बापरे…! कारागृहातील कैद्यांत झाली सिनेस्टाईल हाणामारी..?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- आजपर्यंत आपण चित्रपटात कैद्यांच्या दोन टोळ्यात मारामाऱ्या झाल्याच्या पहिल्या आहेत. मात्र अगदी चित्रपटाला साजेशी अशीच घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

येथील दुय्यम कारागृहातील कैद्यांत भांडण होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद भदे याला आदिवासी समाजाच्या पाच ते सहा आरोपींनी बेदम मारहाण केली.

या भांडणात भदे याला जबर दुखापत झाली असून, त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या दुय्यम कारागृहाची क्षमता ४० असून, याठिकाणी न्यायालयीन तसेच पोलिस कोठडी सुनावलेले सुमारे ८० कैदी आहेत.

या कैद्यांना पुरेशी जागा नसल्याने त्यांच्यात वेळोवेळी तक्रारी होत असतात. त्यातच बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद भदे याला आदिवासी समाजाच्या पाच ते सहा आरोपींनी मिळून बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकाला देखील दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

Ahmednagarlive24 Office