अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-सध्या श्रीलंकलन संघाचा एक गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा एका महिलेसोबत लैंगिक गैरवर्तन करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.
श्रीलंका क्रिकेट ने आपल्या संघाच्या राष्ट्रीय व्यवस्थापकाला नवेदित खेळाडू आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधील एका महिला सदस्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाविषयी अहवाल देण्यास सांगितले आहे.
या प्रसंगा मुळे श्रीलंकन संघाची बदनामी झाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या इंग्लंड आणि श्रीलंका या देशांमध्ये कसोटी क्रिकेट चे सामने खेळले जात आहेत.
श्रीलंकन क्रिकेट ने म्हटले आहे की,बऱ्याच माध्यमांचे वृत्त आहे कि सध्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणाऱ्या श्रीलंकन संघातील एका सदस्याने वैद्यकीय कर्मचारी महिलेशी गैरवर्तन केल्याचं समजलं जात आहे.
हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि याची चौकशी आता लवकरच होणार आहे. या मुळे सदर गोलंदाजाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
श्रीलंकन क्रिकेटने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आम्ही आमचे टीम मॅनेजर असांथा डी मेल यांना सदर घटनेचा अहवाल लवकरात लवकर देण्यास सांगितले आहे,
जेणेकरून माध्यमांच्या वृत्तांच्या सत्यतेची पुष्टी करता येईल. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा शुक्रवारी सुरु होणार आहे.
श्रीलंकन संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी मात्र या सर्व घटनेचे खंडन केले आहे. असे काही झालेच नाही असे त्यांनी सांगितले आहे.