Ahmednagar Crime : पाणी शेतात आल्याच्या कारणावरून दोघांकडून एकाला मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : मोटारीचे पाणी शेतात आल्याच्या कारणावरुन दोघा जणांनी बाबासाहेब तनपुरे यांना शिवीगाळ करत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दि. ६ मार्च २०२४ रोजी घडली. या घटने बाबत दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बाबासाहेब चिमाजी तनपुरे, वय ५९ वर्षे, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, बाबासाहेब तनपूरे यांच्या शेती शेजारी दशरथ माधव तनपुरे यांची शेतजमीन आहे.

दोघांमध्ये शेत जमीनीचे कारणावरुन वाद आहे. दिनांक ६ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. चे सुमारास बाबासाहेब तनपुरे हे त्यांच्या शेतात विहीरीवरिल मोटार चालु करणे करीता गेले. तेथे आरोपी त्यांना म्हणाले कि, तुमच्या मोटारीचे पाणी आमच्या शेतात आले आहे.

तुम्ही कसे काय आमच्या शेतात पाणी येऊ देता. असे म्हणुन मला शिवीगाळ करु लागले. त्यावेळी बाबासाहेब तनपुरे त्यांना म्हणालो की, तुमच्या शेतात पाणी आलेले नाही. सदरचे पाणी तुच्याच फिल्टरचे आहे. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी बाबासाहेब तनपुरे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहान करत कोयत्याने जखमी केले.

तसेच पुन्हा आमचे नादी लागलास तर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली. बाबासाहेब चिमाजी तनपुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दशरत माधव तनपुरे व सतिष दशरथ तनपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.