अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- पवनचक्की चालवण्यास विरोध करत या पवनचक्कीच्या वीज वाहिन्यांवर आकडा टाकून वीजपुरवठा खंडित करून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाऊन दमदाटी करणाऱ्यास याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पोलिसास त्या इसमाने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील आगडगाव शिवारात घडली आहे.
या घटनेत धर्मनाथ बाबाजी पालवे असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शब्बीर जमालभाई शेख याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील आगडगाव परिसरात विंड वर्ल्ड इंडियाया कंपनीच्या पवनचक्क्या उभा केलेल्या आहेत.
येथील गट नं२९६ मध्ये शब्बीर जमालभाई शेख (रा. आगडगाव) हा मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या वीज निर्मिती करण्यात अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे सदर कंपनीने कोर्टात पोलिस बंदोबस्त देण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पोलिस बंदोबस्त पुरवून ही दि.९ सप्टेंबर रोजी पवनचक्की सुरू केली.
मात्र दि.२८सप्टेंबर रोजी या ठिकाणी कंपनीचे सुरक्षारक्षक विष्णू कांतीलाल सानप, न्यानदेव हिराजी वामन व साईट सुपरवायझर संभाजी तुकाराम पालवे हे असताना शेख हा त्या ठिकाणी आला व कंपनीने माझ्या जमिनीत अतिक्रमण करून पवनचक्की उभा केली आहे.
असे म्हणून पवनचक्कीच्या विजवाहिन्यावर आकडा टाकून वीज पुरवठा खंडित केला. असा प्रकार घडल्याने सुपरवायझर पालवे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली व पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी कौडगावचे बिट हवलदार धर्मनाथ पालवे व सहायक पोलिस उपनिरीक्षक गांगरडे त्या ठिकाणी गेलो असता.
पवनचक्कीच्या विजवाहिन्यावर आकडा टाकून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत शेख यास विचारणा केली असता ही माझी जमीन आहे,कंपनीचा काहीही संबंध नाही असे म्हणत तुम्ही मला सांगणारे कोण,
तुम्ही इथे का आलात असे म्हणत मला व सहकाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यात पालवे यांच्या हाताला बँडेज ओढून काढल्याने मुका मार लागला आहे. या फिर्यादीवरून शबीर जमालभाई शेख याच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.