अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : १० लाख रुपये किंमतीची पिकअप चोरीला ! ग्रामपंचायत सदस्य म्हणतात मी आता…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : संगमनेर तालुक्यातील साकुर येथील भुजबळ वस्ती येथून घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी पिकअप चोरून नेल्याची घटनेला पंधरा ते दिवस उलटून गेले पोलिसांना अद्यापही पिकअपचा शोध लागला नाही.

येत्या १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत घारगाव पोलिसांनी पिकअप शोधून न दिल्यास १५ ऑगस्ट २०२३ पासून संगमनेर पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रा.पं. सदस्य सुनिल निवृत्ती भुजबळ यांनी दिला आहे.

याबाबतचे पत्र संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. सदर पत्रात म्हटले आहे की, साकुर येथील भुजबळ वस्तीवर माझ्या कुटुंबासोबत राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो.

शेतीच्या कामासाठी सन २०१३ साली जुनी महिंद्रा बोलेरो पिकअप (एम. एच. 43 ए.डी. 5367) घेतली होती. पिकअपचा वापर घरगुती शेतीचा माल व शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतुकीसाठी करत होतो.

दरम्यान, १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या वेळी पिकअप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली आहे. तसेच अज्ञात चोरट्यांनी पिकअप चोरून नेल्याचे साकुर पासून ते श्रीरामपूर पर्यंत रस्त्याच्या लगत असलेल्या विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असताना देखील घारगाव पोलिसांनी पिकअपचा शोध लावला नाही. १० लाख रुपये किंमतीची पिकअप चोरीला गेल्याने माझी मनस्थिती ढासळत चालली आहे. घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपासी पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Ahmednagarlive24 Office