Ahmednagar Crime : प्लॉटिंग खरेदी, विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर हल्ला करणारे आरोपी जेरबंद करण्यात आले आहे. सुधीर हरिभाऊ बाबर (ब्राह्मण गल्ली, शेवगाव) व सुमित सुधीर बाबर असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
सुभाष रायनभर खरड (रा. देवटाकळी) यांनी उसने पैसे मागितले असता त्यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आरोपींना अंबड येथून अटक करण्यात आली.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर,
सपोनि. हेमंत थोरात, पोना.रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष खैरे, किशोर शिरसाठ, जालिंदर माने, अरुण चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.