अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध धंदयांविरुद्ध धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरूचे ठेवले आहे. नुकतेच पोलीस पथकाने पारनेर तालुक्यात कारवाईची विशेष मोहिम राबवून ३ ठिकाणी छापे टाकले.
या ठिकाणी सुरु असलेले गावठी हातभट्टी दारुचे अड्डे उध्दवस्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काळु भानुदास पवार, (रा.कान्हुर पठार, ता.पारनेर),
आरोपी विशाल चंद्रकांत आढाव,(रा.कान्हुर पठार, ता.पारनेर) व आरोपी बाजीराव शंकर गायकवाड, रा. पळशी, ता. पारनेर, या ३ आरोपी विरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच घटनास्थळाहून एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाई करिता,
पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी, स्थानिक गुन्हे शाखे मार्फत होत असलेल्या कारवाईमुळे, अनेक अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.