अहमदनगर क्राईम

एमआयडीसी मधील कंपनीत चोरी करणारे सराईत चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर एमआयडीसी मधील झेन कंपनीतील कॉपर पट्टया चोरुन नेणारे सराईत चोरट्यांना अटक केली आहे.

या चोरट्यांकडून पोलिसांनी ७ लाख २९ रु हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त केला आहे. हि आहेत आरोपींची नावे… सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भानुदास कु-हाडे (वय ३३ मुळ रा. चितळी रेल्वे स्टेशन, चितळी, ता. राहाता हल्ली रा. वडगाव गुप्ता अ.नगर),

राहुल सुरेश जाधव (वय २९ रा. पाण्याचे टाकी जवळ, प्रवारा संगम ता. नेवासा), पंकज बापू गायकवाड (वय २७ रा. गोधवणी ता. श्रीरामपूर), आकाश रामचंद्र भोकरे (वय २३ रा. कायगावटोक, ता. गंगापुर जि. औरंगाबाद) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यता घेतले आहे.

आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यविरुध्द यापूर्वी दरोडा, चोरी, बेकायदा गावठी कट्टे जवळ बाळगणे, विनयभंग, दारु व जुगार अशी गुन्हे दाखल आहेत.

आरोपी कुन्हाडे याचेविरुध्द नाशिक, कोपरगाव यासह अन्य ठिकाणी एकूण १७ गुन्हे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनीक कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी भागाजी कुदनर हे दि.२२ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे ४.४० वा. सुमारास

कंपनीमध्ये वॉचमन सोन्याबापू विजय पळसकर व विलास परासराम नेवसे हे कंपनीमध्ये डयूटीवर असतांना अनोळखी ६ ते ७ चोरटयांनी कंपनीमध्ये जाऊन वॉचमन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून व जिवे मारण्याची धमकी दिली.

व कंपनीमधील १७ लाख ५० हजार रु. किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पटयांचे १० बॉक्स दरोडा टाकून चोरुन नेले, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office