अहमदनगर क्राईम : ऊर्जामंत्र्यांसह वीज वितरणच्या महिला अभियंत्याविषयी अश्लिल पोस्ट टाकणे पडले महागात

Ahmednagar News:वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंता महिलेच्या बाबतीत फेसबुकवर शिवीगाळ करुन तुम्ही कामात भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख करुन उर्जामंत्री व महिलेविषयी अश्लील भाषेत कमेंट करणे एकाला आता चांगलेच महागात पडणार आहे.

आशा प्रकारची तक्रार जिल्ह्यातील पाथर्डी पोलिसात दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी प्रल्हाद बाबासाहेब किर्तने याच्या विरु्दध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, किर्तने हे वीजकंपनीच्या कामानिमीत्त कार्यालयात येत असल्याने मी त्यांना ओळखते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांनी यापुर्वीही मला शिवीगाळ करुन दमदाटी केली होती. मात्र मी तक्रार दिली नाही. कार्यालयातील एका सहाय्यक अभियंत्यांनी मला फोन करुन सांगितले की, फेसबुकवर तुमच्या विषयी काहीतरी लिहीले जातेय ते पहा.

त्यानंतर मी फेसबुकवर पाहीले तेव्हा किर्तने याने माझ्या विषयी अश्लील भाषेत असलेले संभाषणाचा व्हीडीओ टाकला असल्याचे मी पाहीले. तालुक्यातील एका कामात तु भ्रष्टाचार केला आहे.

उर्जामंत्री यांच्याबाबतही अर्वाच्य भाषेत टिपन्नी केलेली आहे. मला शिवीगाळ करुन दमदाटी केली. अशी तक्रार वीज कंपनीच्या महिला सहाय्यक अभियंता यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.