खासदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अॅड. राहुल झावरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मा. नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह इतर तीन दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत मंगळवारी पारनेरच्या न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली.
दरम्यान, या प्रकरणातील इतर आठ आरोपी अद्यापही फरार आहेत.गेल्या गुरूवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अॅड. राहुल झावरे यांच्यावर पारनेरच्या आंबेडकर चौकात मा. नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, मा. नगरसेवक नंदू सदाशिव औटी, प्रितेश पानमंद, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनू दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, मंगेश सुभाष कावरे, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहोकले,
प्रथमेश दत्तात्रेय रोहोकले, सुरेश अशोक औटी व इतर ३ ते ४ अनोळखी इसमांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यात झावरे हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर नगरच्या खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
झावरे यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीसांनी विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे या आरोपींना अटक केली होती. त्यांच्यासह इतर आरोपींवर खुनाचा प्रयत्न तसेच आर्म अॅक्टच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या शुक्रवारी चारही आरोपींना न्यायालयापुढे उभे करण्यात आले
त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. न्यायालयीन कोठडीची मंगळवारी मुदत संपल्याने आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयापुुढे उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केल्याचे पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समिर बारवकर यांनी सांगितले.