अहमदनगर क्राईम

भाड्याने केलेली गाडी चोरणारे जेरबंद! न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- भाड्याने केलेली गाडी प्रवासा दरम्यान चोरुन नंतर त्या गाडीची विक्री करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलिसांनी जेरबंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुंबईतील ड्रायव्हर दिपककुमार गुप्ता हे त्यांच्या ताब्यातील स्विप्ट कार घेवून मुंबई येथे असताना त्यांना जस्टडायल वरुन मुंबई ते औरंगाबाद भाडे आले.

त्यांनी सायंकाळी ७ वाजता तीन इसमांना गाडीमध्ये बसवून बांद्रा येथून ते औरंगाबादच्या दिशेने निघाले.दि.२० रोजी गाडी अहमदनगर ते औरंगाबाद रोडवरील नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत हांडीनिमगाव शिवारात ५ च्या सुमारास आली.

फिर्यादी गुप्ता लघुशंका करण्यासाठी खाली उतरले असता गाडीतील तिघांनी गाडी चालू पळ काढला.याप्रकरणी गुप्ता यांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचा अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर यांच्याकडील मोबाईल सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत असताना आरोपी पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत चोरलेली स्विप्ट कार फिरवत असल्याचे समजले.

त्या ठिकाणी पाटोदा पोलीस स्टेशनची मदत घेत रिजवान पठाण (वय ३०वर्षे) रा. निरगुडी ता. पाटोदा जि.बीड, महेश रामकृष्ण आघाव (वय ३५ वर्षे)रा खांकरमोह ता. शिरूर कासार जि.बीड,वागवान अफताव वागवान रहीमुद्दीन (वय २३ वर्षे) रा.प्रकाश आंबेडकरनगर वार्ड क्र. २५ बीड व जुबेर मुसा भागवान (वय २१ वर्षे) रा टाफरवन ता. माजलगाव जि. बीड यांना ताब्यात घेण्यात आले.

ते चोरलेल्या कारची विक्री करताना आढळून आले.सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.आरोपींकडून अशाच प्रकारे इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office