अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार, धक्कादायक प्रकार समोर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. आता आणखी एक घटना समोर आली आहे. महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वांरवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर सदर महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. कोतवाली पोलिसांनी राजू उर्फ खुदाबक्ष मुस्ताक शेख (रा. सर्जेपुरा, अहमदनगर) या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी : वरील आरोपीने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला.

तिच्यासोबत लग्न केले तर नाहीच परंतु तिलाच मारण्याची धमकी दिली. हा आरोपी फरार झाला होता. तो म्युनसिपल कॉलनी, नालेगाव, अहमदनगर येथे येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले आहे. चौकशी करताच त्याने गुन्हयाची कबुली दिली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई सुखदेव दुर्गे, पोहेकॉ तनवीर शेख आदींच्या पथकाने केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office