अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- येथील औरंगाबाद रोडवर असलेल्या सीक्यूएव्ही परिसरातून वारंवार चंदनाची झाडे, त्यातील गाभा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत.
12 फेब्रवारी ते 14 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान सीक्यूएव्ही परिसरातून आठ हजार रूपये किंमतीचे चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याप्रकरणी संजीवकुमार अप्पकुतला पिल्लई (वय 51) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील येथून चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा चोरून नेल्याची घटना घडली होती. वारंवार अशा घटना घडत आहेत.
आताही आठ हजार रूपये किंमतीचे झाडे तोडून त्यातील गाभा चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक पठाण करीत आहेत.