अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : सराईत मोटारसायकलचोर पोलिसांच्या जाळ्यात ! अडीच लाखांचा मुद्दमाल हस्तगत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : चोरीस गेलेल्या एका मोटरसायकलचा तपास करताना चक्क सहा गुन्हे उघडकीस आल्याची घटना घडली आहे. आरोपीकडून सहा मोटारसायकलींसह २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मोटारसायकल चोरास लोणी पोलिसांनी शिताफीने पकडल्याने हा मोटारसायकल चोर लोणी पोलिसांच्या हाथी लागला असून सुतावरून स्वर्ग शोधण्याच काम लोणी पोलिसांनी केले आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गणेश शरद बर्डे (रा. लोमेश्वर नगर, लोणी) असे अटक करण्यात आल्या आरोपीचे नाव आहे. कोल्हार येथील एका संकुलात कॉम्प्युटर सेंटर असलेल्या ठिकाणाहून २५ जुलै रोजी एक मोटारसायकल चोरीस गेली होती.

याबाबत संजय रामनाथ शिंदे (रा. कोल्हार) याने लोणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदरकडून मिळालेल्या माहिती नुसार लोणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

आरोपी गणेश बर्डे यास ताब्यात घेऊन पोलीस रिमांड व कस्टडीत घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office