अहमदनगर क्राईम

चोरट्यांची हिंमत तर पहा… पोलीस वसाहतीतुन वाळूचा ट्रक चोरट्याने पळविला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महसूल खात्याने कारवाई करून येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेला वाळूने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime)

या घटनेने खळबळ उडाली आहे. कारवाई करून आणलेली वाहने देखील सुरक्षित राहत नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक केली जाते.

महसूल प्रशासन वाळू वाहणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई करून हे ट्रॅक्टर जप्त करतात. दरम्यान जप्त केलेले ट्रॅक्टर संगमनेर शहरातील पोलीस वसाहतीच्या मोकळ्या मैदानात लावण्यात येतात.

अशीच कारवाई करून एक ट्रॅक्टर 1 ब्रास वाळू भरलेली ट्रॉली लावण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने 15 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीमध्ये या ट्रॅक्टरची चोरी केली.

ट्रॅक्टर चोरीबाबत तलाठी पोमल तोरणे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office