अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News : विवाहित जोडप्याची आत्महत्या ‘या’ ठिकाणी घेतला गळफास !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  (Ahmednagar Crime News) एका विवाहीत जोडप्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गावाच्या शिवारातील वन विभागाचा हद्दीत घडली आहे.

या घटनेतील मृत दोघेही विवाहित आहेत. या घटनेतील पुरूष मांडओहोळ (खडकवाडी) येथील व महिला माळवाडी( पळशी )येथील आहेत.

दरम्यान वडगाव सावताळ – वनकुटे रस्त्यावरील वनविभागाच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना ग्रामस्थांनी दिली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक घनश्याम बळप सपोनि प्रमोद वाघ यांच्यासह विलास लोणारे घटनास्थळी दाखल झाले. वडगाव सावताळ येथील वन विभागाच्या नर्सरी समोरील पूर्वेच्या बाजूस २० ते २५ वर्ष वय असणाऱ्या दोन्ही प्रेमीयुगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतली होती.

आत्महत्येच्या ठिकाणी एक चारचाकी गाडी देखील आढळून आली आहे, याबाबत वडगाव सावताळचे सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी यासंबंधीची खबर टाकळी पोलिसांना दिली असून या घटनेचा अधिक तपास टाकळी ढोकेश्वर पोलिस करत आहेत.

Ahmednagarlive24 Office