अहमदनगर क्राईम

धक्कादायक :अल्पवयीन मुलीवर अत्याचार : समाजात बदनामी होऊ नये म्हणून कुटूंबियांनी तिला…?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- प्रेमाचे नाटक करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा गंभीर प्रकार थेट पीडित मुलगी प्रसूत झाल्यानंतर हा उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील एका गावात घडला आहे.

याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रियकराने प्रेमाचे नाटक करुन तालुक्यातील एका १५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे.

त्यात अल्पवयीन तरुणी दुसऱ्याच महिन्यात गरोदर राहिली; परंतू गावात चर्चा व्हायला नको, समाजात बदनामी होऊ नये, म्हणून तिच्या कुटूंबियांनी तिला तब्बल नऊ महिने घरातच ठेवले.

प्रसुतीची तारीख जवळ आल्याने तिला त्रास होऊ लागला. म्हणून घरच्या घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केला मुलीची अवस्था नाजुक असल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.

दरम्यान पिडित मुलीला रुग्णालयात नेत असताना तिची संगमनेर बस स्थानकाजवळ प्रसुती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला, मात्र वय कमी असल्याने प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव झाल्याने

तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालुन पीडित तरुणीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला असून मारुती भवारी (रा. वारंघुशी, ता. अकोले) याला अटक केली आहे.

Ahmednagarlive24 Office