अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी हौदास माजवला आहे. दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण पसरले आहे.
रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोर्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती सध्या पारनेर तालुक्यात निर्माण झाली आहे.
राहूरी तिळापूर गावामध्ये कपडे धुत असलेल्या महिलेच्या गळयातील ५० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे तिन भामटयांनी ओबडून नेले. दरम्यान या प्रकरणी आरोपीना तातडीने अटक करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मथुराबाई जनार्दन पवार (वय ५५) या महिला कपडे धुण्यासाठी गेली असता आकाश नरेंद्र परदेशी (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) तसेच त्याच्यासोबत असलेले मेहंदी रंगाचा टीशर्ट व काळया रंगाची पॅन्ट तसेच आणखी एका इसमाने पवार यांच्या गळयातील सोन्याचे दागीने ओरबडून नेले.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर तसेच राहूरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.