अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भर दिवसा दुपारी चारच्या सुमारास घराचे व दुकानचे कुलुप तोडून हात साफ केला. हि घटना नेवासा तालुक्यातील सोनई-घोडेगाव रोडवर मुळा कारखाण्याजवळ हदली आहे.
दरम्यान शिवाजी अनारसे यांच्या घरी हि चोरीची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घरमालक शिवाजी अनारसे हे कारखाना येथे नोकरी निमित्त तर त्यांच्या पत्नी नगर
येथे नोकरी निमित्त गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली परंतु त्या ठिकाणी काही हाती लागले नाही.
हताश झालेल्या चोरट्यांनी जवळीलच दुकानचे शेवटचे कुलुप तोडून आतील किरकोळ रक्कमेवरच समाधान मानत त्या ठिकाणावरुन काढता पाय घेतला. भर दिवसा होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.