टँकरची लष्करी वाहनास धडक; दोन जवान जखमी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  टँकरने लष्करी वाहनास धडक दिल्याने येथील आर्मड कोअर सेंटरमधील दोन जवान जखमी झाले. अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात बाह्यवळण रस्ता चौकात हा अपघात झाला.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरवरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटरमध्ये नियुक्तीस असलेले संजीवकुमार परणसिंग गुर्जर (वय 29 मूळ रा. मध्यप्रदेश) हे लान्स नायक जयवंत तुलछसिंग यांच्यासमवेत लष्कराची कारमधून दौंड महामार्गाने अहमदनगरच्या दिशेने येत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अरणगाव शिवारात बाह्यवळण रस्ता चौकात त्यांना टँकरने चालकाच्या बाजुने जोराची धडक बसली.

या अपघातात संजीवकुमार आणि जयवंत हे दोघे जखमी झाले आहेत. संजीवकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविणे,

दुखापतीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस नाईक जयश्री बडे पुढील तपास करीत आहेत.