Ahmednagar News : प्रॅक्टीकलच्या मार्काबाबत ब्लॅकमेल करत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केले धक्कादायक कृत्य, नगर शहरातील घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक व विद्यार्थ्यांचे पवित्र नाते असते. परंतु नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार शहरात घडला आहे. ‘प्रॅक्टीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल, असे म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे.

नगर शहरातील एका महाविद्यालयात सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका प्रसिद्ध विद्यालयातील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरात राहत असून एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सध्या तिचे प्रॅक्टीकल सुरू असून हा शिक्षक त्या शाळेचा शिक्षक आहे. तो फिर्यादीच्या एका विषयाचे प्रॅक्टीकल घेत आहे.

5 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी विद्यालयात असताना तो तिला म्हणाला,‘तुला प्रॅक्टीकलला पैकीचे पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहितरी द्यावे लागेल’, परंतू फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. द

रम्यान फिर्यादीला प्रॅक्टीकलला शून्य मार्क दिल्याने त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ती 8 फेब्रुवारी रोजी त्याच्या कॅबिनमध्ये गेली असता त्याने लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने अश्‍लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घडलेला प्रकार फिर्यादीने घरी सांगितला व शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.