अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- दिल्लीतील मानससरोवर पार्कमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक शिक्षिकेनं आपला पती लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून आत्महत्या केली.
मात्र मुलीच्या घरच्यांनी हुंड्यावरून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.मृत तरुणीचे नाव आकांक्षा (वय-27 वर्ष) असून तिनं कोणतीही सुसाइड नोट सोडलेली नाही.
सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, मृत आकांक्षा परिवारसोबत मानसरोवर पार्कच्या नथू कॉलनीमध्ये राहत होती.
पती अंकुरशिवाय कुटुंबात इतरही सदस्य आहेत. आकांक्षा एका सरकारी शाळेत शिकवते, तर अंकित एका खासगी कंपनीत नोकरी करतो.
आकांक्षाच्या आईनं असा आरोप केला आहे की अंकितचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. आकांक्षाची आई संतोष देवी यांनी सांगितले की, 11 मे 2018 रोजी आकांक्षा आणि अंकितचे लग्न झाले.
त्यांचा आरोप आहे की सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. आकांक्षाचा पगारही बळजबरीने घेत होते. जवळपास सहा महिन्यांपासून आकांक्षा तिचा पगार देत नव्हती. यामुळे कुटुंबात खूप भांडणं होत होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com