अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : शिक्षकाने शेतात केला महिलेचा विनयभंग

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त आले आहे. प्राथमिक शिक्षकाने शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयंभग केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर त्याने विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील एका गावात एक महिला शेतात काम करत होती. तेथीलच रहिवासी संतोष अशोक अकोलकर हे शेतात काम करणाऱ्या महिलेजवळ गेले. ‘तुझ्या पतीने माझ्या बायकोच्या विरोधात ती काम करीत असलेल्या संस्थेकडे अर्ज करून माझ्या बायकोची करंजी येथून बदली केली.

त्यास तुझा पतीच जबाबदार आहे, असे म्हणत विनयभंग केला. तिला शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी दिली. संतोष हा एका प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक आहे. दरम्यान त्या महिलेने आरडाओरड केला.

त्यामुळे त्या शिक्षकाने तेथून काढता पाय घेत तेथून पळ काढला असल्याचे सदर महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून संतोष अशोक अकोलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासाअंती घटनेविषयी अधिक माहिती समोर येईल.

Ahmednagarlive24 Office