Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली.

त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच वाळू उपसा करणारे वाळूतस्कर व दोन चार चाकी वाहने चालकाने पळवून नेले;

मात्र एक ७०९ टेम्पो मिळून आला. महसूल विभागाचे तलाठी शरद गिते, सुनिल गित्ते, श्रीकांत पाटोळे, तुषार काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. हे वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालय राहुरी येथे पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आले आहे.

राहुरी रेल्वे स्टेशन, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव आदी परिसरात मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा होत असून वाळूतस्कर आपला व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी एकमेकांना टार्गेट करत असून बैलगाडी चोरी करणे, गाडी पळवून नेणे, पोलिसांना, महसूल विभागाला खबर देणे आदी प्रकार घडत असून प्रामाणिक काम करणारे महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे वाळूतस्कर मुळा नदीचे पात्र लुटण्याचे काम करत असताना आता काही ठिकाणी शासनाची मालमत्ता संरक्षण करण्याची जबाबदारी असणारे नदी पात्रात जेसीबीने उपसा करून कुंपणच शेत खात असल्याचे उघड झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe