अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा ‘तो’ मुलगा जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : श्रीगोंदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून आमिष दाखवत पळवून नेलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी कर्जत तालुक्यातील राशीन येथून ताब्यात घेतले.

अमोल धनाजी गोडसे (रा. थेरवडी ता. कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील पूर्वेकडील एका गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी श्रीगोंदा येथील वसतीगृहात विद्यालयीन शिक्षणासाठी राहत होती.

२८ जानेवारी रोजी आरोपी अमोल गोडसे याने या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल लोकेशनाच्या सहाय्याने तपास करत तांत्रिक विश्लेषण करत अमोल धनाजी गोडसे या आरोपीला राशीन येथून अल्पवयीन मुलीला तसेच आरोपीला ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, पो.ना गोकुळ इंगवले, गुलाब मोरे, पो. कॉ.प्रताप देवकाते, मनोज साखरे, म.पो.काँ. गिता लाड यांनी केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office