अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे आता प्रशासनाने देखील कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच जिल्ह्यातील बेलापूर खुर्दमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका प्रशासनाने दि.7 ऑक्टोबरपर्यंत हॉटस्पॉट जाहीर केल्याने येथील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
बेलापूर खुर्द गावात 15 करोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी काही बरेही झाले आहेत. मात्र पुढील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यासंदर्भात श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आदेश जारी केला असून त्यानुसार येत्या 7 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
बेलापूर खुर्द गावात आत्तापर्यंत 15 रुग्ण आढळून आले असून काही रुग्ण बरे झाले आहेत. बरेच रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, हे चुकीचे असले तरी काही रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
गावात रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून रुग्ण असणार्या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, गावातील करोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली असून पुढे सणासुदीचे दिवस असल्याने गावातील व्यवहार शिथील करण्याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांना भेटून विनंती करण्यात येणार असल्याचे उपसरपंचासह ग्रामस्थांनी सांगितले आहे.