अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- गाडीचा हॉर्न वाजविला या कारणावरून एक़ास लोखंडी पाईपने हातावर व पायावर मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरात बाजारतळ भागात घडला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील बाजारतळ भागात एका दुकानासमोर एका चारचाकी गाडी मधून जाणारे किरण धोत्रे,
सागर म्हस्के, यांनी गाडीचा हॉर्न वाजविला. तेव्हा तेथे असलेला समीर लतीफ पिंजारी (वय 24) रा. वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली, श्रीरामपूर हा म्हणाला की, तुम्हाला जाण्यासाठी रस्ता रिकामा आहे.
हॉर्न वाजवू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघा जणांनी शिवीगाळ करीत आज तुझा शेवटचा दिवस आहे, तुला संपवून टाकतो, असे म्हणत भंगारच्या दुकानासमोर पडलेला लोखंडी पाईप घेऊन हातावर व पायावर मारला.
तू आज वाचला परत आमच्या नादी लागला तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. याप्रकरणी समीर लतीफ पिंजारी या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी किरण धोत्रे,
सागर म्हस्के, (दोघे रा. बाजारतळ, वॉर्ड नं. 3 श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी पकडले आहे.