अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- तु मला फार आवडतेस असे म्हणून एका बार चालकाने आम्लेटपाव विकणार्या महिलेच्या घरात जाऊन तिला मिठी मारली. पीडितेने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
अवदुत काशिनाथ घोडके (रा. गुजरी मार्केट, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे. अकोले पोलिसानी आरोपीस अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोलेमधील शाहुनगर परिसरात एका 31 वर्षीय महिलेचा आम्लेटपाव विक्रीचा व्यवसाय आहे. पीडितेचे पतीचे निधन झाल्याने ती आम्लेटपाव विक्री करून आपला निर्वाह करत आहे.
दरम्यान एके दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला तिच्या घरात टिव्ही पाहत बसली होती. तर, दुसर्या घरात एक मुलगा अभ्यास करत होता. तेव्हा अवदुत घोडके हा अचानक घरात आला.
पीडित महिलेने विचारले की, तु येथे काय करतो आहे? तेव्हा तो म्हणाला की, तु मला फार आवडतेस असे म्हणून त्याने महिलेस मिठी मारून कवेत घेत अश्लिल चाळे सुरू केले.
तेव्हा पीडित महिलेने त्यास तत्काळ प्रतिकार करीत स्वतःला त्याच्या तावडीतून सोडून घेतले. घरात गोंधळ निर्माण झाल्याने आरोपीने तेथून पळ काढला.
तसेच जर घडलेला प्रकार कोणाला सांगशील तर तुझ्याकडे बघुन घेईल अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.